स्वामी विवेकानंदाची देशभर नव्हे तर जगभर ख्याती होती. त्यांची शिकवण, विचारांची, बुद्धिमत्तेची जगभर भुरळ होती. त्या काळी स्वामी देशभर भ्रमण करायचे. आपले विचार सामान्य लोकांपर्यंत पोहोचवायचे. त्यांच्या बुद्दीमत्तेची तशी सगळ्यांनाच प्रचीती आली होती. जसे त्यांचे अनुयायी होते तसेच त्यांचा तिरस्कार करणारे लोक हि होते.
असेच एकदा एका राज्यात स्वामी येणार अशी बातमी त्या राज्यातील एका राजाला लागली. स्वामी येणार म्हणून राजा तयारीनिशी स्वामींना कोंडीत पकडायचे ठरवले आणि काही असे प्रश्न विचारून त्यांची फजिती करायची ठरवली.
त्यांना भेटीस बोलावून त्यांना विचारलेला प्रश्न आणि स्वामी विवेकानंदानी बुद्धिमत्तेने दिले उत्तर .....
राजा : स्वामी, तुम्ही हिंदू धर्माचे एवढे अभ्यासक ! तुमचं धर्मा विषयी ज्ञान बघून माझा एका प्रश्नच उत्तर द्या कि "हिंदू धर्मात मूर्ती पूजा का करतात ??"
स्वामी : (थोडावेळ शांत बसून...त्यांचे लक्ष सहज भिंतीवरच्या चित्राकडे गेले .... भिंतीवर बोट दाखवत ) ती भिंतीवरची तसबीर कुणाची आहे ??
राजा : माझ्या वडिलांची.....
स्वामी : ती भिंतीवर लावण्याचे कारण ?
राजा : ते दिवंगत झाले असून, त्यांची आठवण सदा राहावी म्हणून काढलेल्या चित्राची तसबीर आहे ती ....
स्वामी : ती काढून द्याल ?
(राजा अचंबित ... त्याला समजत नव्हते कि स्वामी नक्की काय करताहेत ??... राजाने ती तस्वीर काढून स्वामींना देऊ केली.)
स्वामी : ती तस्वीर तुमचा हातात ठेवा ... आणि आता त्या तास्वीरीवर थुंका !
(तिथे असलेले सर्वजण अचंबित झाले, राजा तर रागाने लाल झाला )
राजा : स्वामी(ओरडून), हे तुम्ही काय बोलता आहात ? हि सामान्य तस्वीर नसून माझा दिवंगत वडिलांची तस्वीर आहे. त्यावर तुम्ही थुंकायला सांगता ??
स्वामी : (शांतपणे ) राजा, का नाही ? ती एक साधारारण शी कागदाची चौकट आहे आणि त्यावर असणारे चित्र हे खोटे आहे. त्यात तुमची खरेखुरे वडील नाहीत मग त्यावर थुंका ...
राजा : नाही , ते चित्र खोटे असले तरी माझा वडिलांची छबी त्यात आहे ती माझासाठी सामान्य चौकट कशी असू शकते?
स्वामी : (किंचित हसून ) राजा, मूर्ती पूजेच उत्तर तुम्हीच तुमचा तोंडून दिले..आता मी तुम्हाला वेगळे काय सांगणार ....? ज्या भक्तांनी आपल्या भगवंताला कधीही पहिले नाही अशा "भगवंताची" छबी जेव्हा भक्तीने एका दगडात उतरवली गेली त्याला आपल्या मनातील 'मानवी' रूप देऊन जर त्याची पूजा केली तर काय अयोग्य आहे? ती एक सामान्य मूर्ती नसून आपल्या श्रद्धेने दगडाला देवत्व प्राप्त करून दिले आहे ...राजा, हे तुम्हालाही माहित आहेत कि त्या तास्वीरीत तुमचे वडील नाहीत पण त्यांच्यावरची असणारी श्रद्धा तुम्हाला सांगतेय कि त्या तास्वीरीत "ते" आहेत मग एका निर्जीव दगडात देव असणे योग्यच नाही का ?
(स्वामीच्या उत्तराने .... राजाला नक्कीच चोख उत्तर मिळाले असेल अशी आपण आशा ठेऊया )
No comments:
Post a Comment