ये अबोली लाज गाली, रंग माझा वेगळा .....! या रंगीबेरंगी जगात त्या अनोळखी रंगांना भेटायचंय,आयुष्य खरंच सुंदर आहे का ते पुन्हा चाचपून पहायचंय......!!
निळं गुलाब !!!

Saturday, 17 December 2011
रिंगा रिंगा ...............
मराठीत पाहिलेला दमदार सिनेमा. दमदार यासाठी कारण या आधी रोमांचित चित्रपट बरेच पाहिलेत हिंदीत ...पण ते रोमांचित वैगरे असे कधी वाटलेच नाहीत. कथानक फक्त फिरवून फिरवून दाखवत असतात... म्हणजे सरता शेवट त्या रोमांचकतेचा भुगा झालेला असतो.....म्हणजे आमचं रिंगा रिंगा झालेलं असते.
रिंगा रिंगा .... २०१० मध्ये प्रदर्शित झालेला सिनेमा मी कालच पहिला .... उशिरा पहिला याचं दुख: नाही पण चांगला सिनेमा पहिला याचा आनंद आहे ...
एक वेगळा व छान प्रयत्न ... मराठीत प्रयत्न सफल होत नाहीत असे मी ऐकलय कारण प्रेक्षक वर्ग फारच कमी आहे...आणि फारच कमी मराठी लोक थेटरात जाऊन सिनेमे बघतात .... जसे मीच बघा ना.. हा सिनेमा २ वर्ष नंतर पहिला... असो..सांगायचा मुद्दा असा कि मला हा सिनेमा अतिशय आवडला... सोनाली कुलकर्णी, अजिंक्य देव, भरत जाधव, उदय सबनीस, अंकुश चौधरी आणि संतोष जुवेकर असे दमदार कलाकार घेऊन एक रोमांचित आणि रहस्यमय सिनेमाच दिग्दर्शन केलंय संतोष जाधव याने..... हि गोष्ट गोव्यातल्या राजकरणाची आणि एका राजकारण्याची ...जो खुर्ची साठी खून सुद्धा पडायला मागे राहत नाहीत असा राजकारणी....ज्याला अजिंक्य देव ने आपल्या भूमिकेने मस्त न्याय दिलाय पहिल्यांदा त्याने खलनायकी भूमिका केली असावी, आणि या चित्रपटाची जान जर कोणी असेल तर ती आहे सोनाली कुलकर्णी ..... उत्तम अभिनय ..... खऱ्या अर्थाने या सिनेमाच नाव रिंगा रिंगा ठेवलय .. कथानक अतिशय चतुराईने फिरवलंय कि तुम्हाला सगळा सिनेमा फिरून फिरून आठवायला भाग पाडते ... अतिशय सुंदर मांडणी, सुंदर अभिनय, कर्णमधूर गाणी .अजून मी काय सांगू ?? सांगण्यात मजा नाही बघण्यात मजा आहे ... पण तो जरूर बघा (बघितला नसेल तर ...)
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment