परवाच आमचा ऑफिसची पिकनिक गेली होती ...कुठे ??? कुठे काय risort वर......भटकंतीचा आभाव असलेली ......पिक-निक !!!!
पिकनिक म्हणजे मौज मज्जा, फिरणं, धिंगाणा ......अजून खूप काही .... जे शब्दात सांगणे कठीणच .... रोजच्या सगळ्या गोष्टी मागे सोडून एका वेगळ्या जगात प्रवेश असतो...एक वेगळाच सुखद अनुभव...रोज हवा हवासा वाटणारा .....
शाळेत असताना पु.ल.चं प्रवास वर्णन वाचून त्या पुस्तकी प्रवासात रंगून जायचो ....वाटायचं कि आपणच तो प्रवास करतोय..बोटीत बसतोय, निसर्ग न्याहाळतोय, मौलो मैल पायी चालतोय तरी वाट सापडत नाहीये ...वाटेत मिळणारे अनुभव, माणस, वाटा, निसर्ग ...जणू तिथेचं प्रत्यक्षात असल्याचा ....भास ..... अनुभव.... वेगळाच ...(म्हणूनच कि काय .... मराठी मनाचे इतके लाडके आहेत आपले ....."पु. ल.")
पिकनिक म्हंटले कि मला शाळेतली "सहल" आठवते ...ती शाळकरी "सहल" अगदी शिष्ठचारी असायची इथेच जायचं नाही तिथे नको .. मोठी माणसे अगदी मानगुटीवर बसलेली असायची. ..राग राग यायचा त्या शाळेतल्या बाईंचा आणि गुरुजींचा... (पण आता समजतेय कि तेव्हा शाळेतल्या एवढ्या मुलांना जबाबदारीने घेऊन जाणे महाकठीण काम) ....आईने दिलेली ती छोटीशी waterbag त्यात खाऊचा डब्बा ...आणि आणि जोडीला हात पकडून असलेली आपली बाल मैत्रीण (जी अगदी आपली खास असायची ...हो तीच ..) .... "मित्र - मैत्रिणीचा हात घट्ट पकडून ठेवायचा....रांगेत चालायचे" अशी बाईंची सूचना .... आणि २-२ अशा जोड्या करून सगळे अगदी रांगेत निघायचो ........ मुंबईत बरीच अशी ठिकाण आहेत जी मी शाळेतल्या पिकनिक मध्ये पहिलीत आणि मला जशीच तशी आठवणीत आहेत..म्हातारीचा बूट, सिमेंट चे विमान, नॅशनल पार्क मधले प्राणी..बगळ्यांची तळ्यातली रांग ... .सगळ्याच अगदी अप्रूप वाटायचं..... खायला खाऊ म्हणून सर्रास आम्हाला शाळेत भेळ दिली जायची .. अगदी ठरलेली ....मग आम्ही सगळे गोलाकार बसून जमिनीवर पाडत , तोंड भर शेव पसरवत भेळ खायचो ....आणि संध्याकाळी निमुटपणे घरी परतायचो ...घरी सहलीची गम्मत सांगायला ....
कॉलेज नंतर सहली चे स्वरूप पार बदलून गेलं .........आता कुठे खरेखुरे जग पाहायला सुरवात केली होती...इतिहास खर्या अर्थाने उलगडायचा असेल तर पूर्ण भारत पालथा घालावा लागेल .... अस म्हणतात कि आपला संपूर्ण जन्म जरी खर्च केला तरी पूर्ण भारत दर्शन होऊ शकत नाही (मग परदेश वारी सोडूनच द्या) ...आणि किती खरय हे बघा ना .....आपण सुद्धा शिक्षणा नंतर नोकरी, घर आणि अशा व्यस्त जीवनात भटकंती म्हणजे वेळ, प्रवास, होणारा खर्च पाहता....आपल्यासाठी हे भ्रमण एक स्वप्नच होऊन राहिले आहे.म्हणजे या जन्मी भारत जन्म जवळ जवळ अशक्यच ... पण तरीही एखादा दिवस विरंगुळा म्हणून पिकनिक करायला आणि वर्षातून एकदा स्वप्न पाहायला ....काय हरकत आहे नाही का ?? मग आपण सुद्धा आपल्या स्वप्नांची वाट बदललीय आता .... पिकनिक चे स्वरूप आता resort मध्ये झालेय...जो-तो resort मध्ये जात असतो ....एखादा छानसा रीसॉर्ट बघून तिथेच ताणून द्यायचं ...खाऊन पिऊन दिवसभर लोळत पडायचं ... तिथल्या तिथे जगायचं अगदी .... यात काही मज्जा आहे का ?? ... या गोष्टी आपण रविवारीही घरी करत असतोचं ना ? मग त्या साठी अस रीसॉर्ट वर जाऊन पैसे उधळणे मला जरा पटतच नाही.... जी भटकण्यात मजा असते ती resort मधे कसली आलीय ?
एकूण काय जिथे मन रमत नाही ती कसली आलीय पिकनिक हो ...म्हणून ऑफिस ची पिकनिक अगदीच रट्याळ वाटली ....
No comments:
Post a Comment