निळं गुलाब !!!

निळं गुलाब !!!

Friday, 16 December 2011

जिंदा है हमीसे नाम प्यार का ....

.....मी आणि माझी मैत्रीण बारावीचा परीक्षेला जात होतो. परीक्षा तशी इतकी महत्वाची नव्हती पण होती. ती परीक्षा क्लास ची होती 'म्हणून' तितकीशी महत्वाची नव्हती पण शेवटी परीक्षाच ती. ईकोचा पेपर होता. परीक्षा क्लास ची असल्यामुळे ती दुपारी ४ वाजता होती. क्लास तसा घरापासून थोडा लांब होता. रोजच्या जाण्यायेण्या मुळे तितकासा लांब वाटत नव्हता एवढच पण १५ - २० मिनिटे जेमतेम लागत असतील पायी चालायला. पण झाले असे कि त्या दिवशी आम्ही बस ने जायचे ठरवले. तसा बस - ट्रेन वैगरे प्रवास या आधी मी कधी केलाच नव्हता. शाळा- कॉलेज जवळच असल्यामुळे मला अशा वाहनांचा उपयोग पडलाच नाही आणि गेलेच तर कधी आई बाबान सोबत पण एकटी दुकटी नाहीच. तसाच अनुभव माझा सोबत असलेल्या मैत्रिणीचा देखील (शेवटी माझीच मैत्रीण) बस नंबर विचारून वेळेच्या आधी पोहोचण्यासाठी ३.३० ला घरातून बाहेर पडलो आणि अगदी व्यवस्थित आम्ही बस मध्ये चढलो देखील. आईने बसमध्ये लागणारे तेवढेच पैसे हि दिले होते अजून Extra नव्हतेच आणि त्या वेळी बस ची तिकीट २-३ रुपये असावी २-3 stop साठी . आम्ही बसमध्ये बसून पेपरासाठी तयारी वाचन सुरु केले. पण बस कुठे चाललीय? आपल्याला कुठे उतरायचं ?? याचाशी आमचा काहीही संबंध नव्हता. मग सहज १० मिनिटांनी बाहेर लक्ष गेले तर रस्ता अनोळखी वाटला. म्हटले असेल ...बस नाहीतरी फिरून फिरून जाते ना ?? मग असेलही ...पुन्हा 'बिनधास्त' वाचन सुरु ... १५-२० मिनिटे झाली अजून stop आला नाही अस मला राहून राहून चुकल्या चुकल्या सारखे वाटत होते (हे मला खरच वाटत होते बर का ...) . पण नंतर थोडे थोडे लक्षात यायला लागले होते कि आम्ही बस तर बरोबर नंबरची पकडलीय पण चुकीची पकडलीय... चुकीची याचा अर्थ विरुद्ध दिशेला जाणारी पकडलीय (म्हणजे जो बस stop सांगितला त्याचा समोरचा stop वरची बस पकडली जी नुकतीच आम्हाला जिथे जायचे तिथून जाऊन आली होती ) . ...धत तेरी कि ... आता मात्र आम्ही बस कंडक्टरला विचारलेच कि हि बस चाललीय कुठे ? (आता कुठे चालालीय ते माहित करून सुद्धा काही समजले नसते पण आम्ही विरुद्ध दिशेला जातोय हे स्पष्ट झाले ) मग बस तिकीट काढतानाच हे कंडक्टर ने सांगायला हवे होते असे हि आम्ही विचारले पण कसले काय उलट ते कंडक्टर साहेब जोक मारताहेत कि आज मुंबई फिरून घ्या म्हणे ... (इथे प्रसंग काय आणि बोलतात काय हे लोक ..) झाले ...... माझा मैत्रिणीने तिकडेच हंबरडा फोडला. मला सुद्धा त्या रस्त्याच ओ का ठो माहित नव्हता. (फक्त जिगरवाली गोष्ट अशी होती कि मी ढसाढसा रडायला सुरवात करत नाही.) पण आता मात्र दांडी गुल झाली होती रडण्याची अवस्था झाली होती पण रडत नव्हते हाच काय तो फरक, एकतर आम्ही कुठे होतो ते आम्हाला ठाऊक नव्हते आणि तिथून परत जाण्यासाठी आमच्याकडे पैसे हि नव्हते. माझा मैत्रिणीचे रडणे बघून मागचा सीट वर बसलेल्या माणसाला दया आली आणि बिचाऱ्याने पाकिटातले १० रुपये काढून माझा हातावर ठेवले आणि रिक्षा पकडून तुम्ही परत जा असे सांगितले. ( आता त्या १० रुपयात काय होणार म्हणा ?..पण ..ते खूप गरजेच होते .. ते नशिब !)
बस मधून उतरून आम्ही रस्त्याचा कडेला आलो. आणि बर्याच जणांना विचारल्या नंतर एका मुस्लीम रिक्षावाल्याला सांगितले कि आम्हाला आमचा क्लास पर्यंत पोहोचवा आम्ही कुठे होतो माहित नव्हते ( कुठे जायचे ते माहित होते) मग त्या रिक्षावाल्यला विनवणी केली कि आम्ही रस्ता चुकलोय. आम्हाला या या पत्यावर पोहोचावा ....पाहिजे तर १० रुपयाचा मीटर होई पर्यंत आस पास सोडा (म्हणजे निदान ओळखीचा रस्ता दिसला तर चालत जाऊ शकू असा विचार होता) मग त्या रिक्षावाल्याने आम्हाला आमच्या ओळखीच्या रस्त्याचे एकदाचे दर्शन दाखवले (या आधी मनात पाल चुकचुकत होती कि हा बरोबर पोहोचवेल ना ?? आणि आम्ही रस्ता चुकलो म्हणून कुठल्या कुठे घेऊन तर जाणार नाही ना ? असे ना ना प्रश्न मनात चालत होते) आम्ही मधेच उतरू असे सांगितले पण त्याने क्लास पर्यंत पोहोचवतो असे म्हणाला. आणि पोहोचवलेही ....आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इथे आमचा कडे असलेले १० रुपये त्याला देऊ केले तर त्याने साफ नकार दिला. त्याने ते पैसे घेतले नाही आणि म्हणाला कि तुम्ही परीक्षाला जा .....कसलाही विचार करण्याची मनस्थिती नव्हती पण एकच विचार तेव्हा मनात आला कि ...यालाच म्हणतात "माणुसकी" ...?? परीक्षा तितकीशी महत्वाची नव्हतीच पण या प्रसंगा मुळे मला त्या दिवशी २ देव माणसे भेटली ...तो बस मधला पैसे देणारा माणूस आणि तो रिक्षावाला !!!

No comments: